Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळबाभूळगाव येथे दुग्धोपादक पशुमित्र स्नेहमिलन सोहळा

बाभूळगाव येथे दुग्धोपादक पशुमित्र स्नेहमिलन सोहळा


बाभूळगाव : तालुक्यातील दुग्ध उत्पादक , पशुमित्र, शेतकरी यांचा स्नेहमिलन सोहळा दि. २२ रोजी स्थानिक एस् कुमार डेअरी येथे आयोजित करण्यात आला.


अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वी. आर. रामटेके हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा पशुसंवर्धन अधीकारीए जिल्हा परीषद यवतमाळ डॉ. राजिव खेरडे, डॉ.हिंगाडे, डॉ. धुर्वे,अक्षय देशमुख, मनोज काळे, अतुल देशमुख, तृप्ती वर्मा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अभिलाष हे उपस्थीत होते.
बाभुळगांव सारख्या छोटया तालुक्यातुन २० वर्षाच्या अथक मेहनतीने उभा राहीलेला हा प्रकल्प पशुपालन करणा-या दुग्ध उत्पादकांसाठी नेहमीच एक आधार स्तंभ राहीलेला आहे.अगदी चहा स्टॉल पासुन सुरु झालेला हा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात शेतकरी व पशुपालकांचा आधारस्तंभ ठरत आहे. जवळपास ४०० दुग्ध उत्पादक डेअरीस आपले दुध रोज देतात. पुढील प्रक्रीया करुन डेअरी आपली उत्पादने मोठ्या शहरातील डेअरी तसेच स्वीट मार्टला पुरवीतात. अतीशय मेहनतीने वाढत गेलेल्या या व्यवसायाची मुहुर्तमेढ आजपासुन २० वर्षा आधी सुधाकर ठाकरे यांनी रोवली. प्रत्येक घटकाचा सन्मान व त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजीत केला गेला. प्रत्येक गावातुन दुध पुरविणाऱ्या दुग्धेत्पादकांचा, उत्कृष्टपणे जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक अधिकारी, पशुपालन करणा-या शेतक-यांना आर्थीक पाठबळ देणा-या बँकाचे कर्मचारी अश्या १९५ व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावीक पशुसंवर्धन विभाग बाभुळगांव चे पशुधन विकास अधीकारी डॉ. प्रशांत झाडे यांनी तर संचालन पद्माकर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी रुपेश आडे, सुरज श्रुंगारे, आकाश घंटेवार, आकाश गेडाम, शुभम धोटे, रमेश मडावी, मनोज देवळे, संदीप पेंदोर यांनी विशेष प्रयत्न केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular