पुसद : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित महाजन पेट्रोल पंप असून नागरी सुविधा पासून ग्राहकांना वंचित ठेवत असल्याचे दिसून येते आहे. पेट्रोल पंप चालकाचा उद्धट पणात ही आता भर पडली आहे. या बाबतची तक्रार जिल्हाधिका-याकडे केली आहे.

महाजन पेट्रोल पंपावर अनागोदी कारभारामुळे सुविधांचा अभाव आहे. 7 जानेवारी रोजी एका ग्राहकाने रुपये 100 चे पेट्रोल टाकले. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी एटीएम कार्ड दिले होते. सदर कार्ड मशीन मध्ये टाकले असता मशीन नादुरुस्त दाखवीत होती. दोन ते तीन वेळा प्रयन्त करून ही पेमेंट मशीनने स्वीकारले नाही. त्यामुळे तेथील पेट्रोल पंप संचालकाने मोबाईलवर पे फोन करून त्या ग्राहकाने रुपये 100 पाठविले. त्यानंतर ग्राहकांना असभ्य वागणुक देण्यात आली. पेट्रोल पंपावर अधिकृत किंमत दर्शविणारा फलक नाही. पेट्रोल डिझेलचे बदलत राहणारे रोजच्या भाव लिहिले नाही. पेट्रोल, डीझलंचा किती साठा आहे याचा लेखा जोखा त्या बोर्ड नाही. नियमानुसार वाहना करिता विणामुल्य हवा असावयास पाहिजे. परंतु गेल्या कित्येक दिवसा पासून हवा देने बंद असल्याचे अनेक ग्राहकांनी सागितले. कर्मचारी यांना तोंडाला मास्क नाही. या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन पेट्रोल पंप कायमस्वरूपी बंद करावा. या बाबतची तक्रार भारत पेट्रोलियम कंपनीचे कंपनी ऑफिसर व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली.