Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळ'पुसद अर्बन'चे अध्यक्ष शरद मैंद यांच्याकडून श्रीराम मंदिरासाठी १ लाख ११ हजार...

‘पुसद अर्बन’चे अध्यक्ष शरद मैंद यांच्याकडून श्रीराम मंदिरासाठी १ लाख ११ हजार रुपये निधी

पुसद: श्रीराम मंदिरात महाआरती सह अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी निधी समर्पण व गृह संपर्क अभियान भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी अभियान प्रमुख अमोल चांडक यांनी ५ शतकापासून श्रीराम जन्मभूमी संघर्षाची माहिती विषद केली. त्यानंतर भक्तांनी ४ लाख ५१०००/ रुपयांचा निधी मंदिर निर्माण संकल्प करीता जाहीर केला. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी १ लाख २२ हजार रुपये तर रवी ध्यानचंद यांनी ५१ हजार रुपये सुरज डब्बेवार ३ हजार रुपये, गिरीश अग्रवाल २५०००/हजार रुपये, निशांत बयास ११हजार, नगर परिषद अभियान प्रमुख हरीओम प्रकाश चौधरी ११ हजार रुपये,भारत जाधव ११ हजार, शंकराव पांडे ५१हजार रुपये, कल्याणी पाटील २१ हजार, राजेश असेगावकर २१हजार, निखिल चिद्रवार ११हजार, अभिजीत पानपट्टे 5100 रुपये दिले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवर, जिल्हा संचालक डॉ.पंकज जैस्वाल, अभियान संयोजक जिल्हा मंत्री बालाजी कामिनवार, राष्ट्रीय स्वय संघाचे प्रा. सुरेश गोफणे व असंख्य रामभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरमंत्री हरीश चौधरी, कोषाध्यक्ष निलेश अग्रवाल, सतीश कनोजे, अभिशेषक गवळी, मकरंद पारडकर, बालाजी करण, महेश काळे, रामचंद्र पंडित, प्रल्हाद पाटील, निरंजन गादेवार, नटवर उंटवाल,सूर्यकांत पोरजवार,चैतन्य राजूलवार, आशिष घुगे, श्रीकांत निंबेकर, सतीश जवळकर, पांडुरंग भोसले, निलेश सिंह यांनी अथक परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular