पांढरकवडा : नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवळणुक २३ जानेवारी रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून साहयक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विवेक जाँन्सन तर साहयक निवडणुक अधिकारी म्हणुन मुख्यधिकारी राजु मुठेमवार, सभा अधिक्षक विनोद अंबाडकर,यांनी काम पाहिले. विषय समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे २३ जानेवारी रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणुक पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी यांचे सुचनेवरुन सकाळ पासुन नामांकन दाखल करने सुरु झाले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे गटनेत्यांनी सार्वजनीक बांधकाम सभापती करीता विजया किसन रोडे यांचे नामांकन केले होते. परंतु सुचक,अनुमोदक हे सबंधित समितीचे सदस्य नसल्याने त्यांचे नामांकन छाननी अंती अध्यासी अधिकारी यांनी रद्द ठरविले. त्यामुळे सर्व पाच हि समितीवर निवडणुक बिनविरोध प्रहार जनशक्ती पक्षाचे सभापतीची निवड झाली. यावेळी त्यात सार्वजनिक बांधकाम सभापती शंकर नारायण कुंघाटकर,शिक्षण सभापती मिना प्रदिप बुरांडे ,आरोग्य सभापती समिक्षा अमर चौटपेलीवार,पाणी पुरवठा सभापती सरफराजोदीन अ.काजी, महिला बाल कल्याण सभापती उषा बाळकिसन आत्राम,यांची निवळ झाली. यावेळी सभा अधिक्षक विनोद अंबाडकर, रविन्द्र मंचलवार, पुंडलीक पुल्लजवार,यांचे सह नगर परिषद कर्मचारी यांनी निवडणुक कार्य पार पाडले.