दारव्हा : यवतमाळ जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर दारव्हा येथे सर्वप्रथम कोरोना प्रतीबंधक लसीकरण मोहीमेचा आरंभ पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

आरोग्यसेवीका मंजुषा एटांगे यांना सर्वप्रथम कोरोना प्रतीबंधक लस देण्यात आली. कोरोना संसर्गामुळे भयग्रस्त वातावरण निर्माण झाले असतांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता सेवा दिली.भारतीय शास्त्रज्ञांनी अथक संशोधन करुन कोरोना प्रतीबंधक लस तयार करण्यात यश मिळविले त्यांचे आभार पालकमंत्री राठोड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसींह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ , पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ , जिल्हा शल्य चिकित्सक तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, जि.प.अध्यक्ष कालींदा पवार,आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष भाऊसाहेब ईरवे ,वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.