शुभारंभ दिनीच एक लाख आठ हजार निधी जमा
ढाणकी : येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ थाटात संपन्न झाला. शुभारंभ दिनीच ढाणकीतील व्यापारी बांधवांचा उत्सफुर्त प्रतिसाद दिसुन आला.

ढाणकीतील प्रतिष्ठीत व्यापारी दातृत्वाचे धनी विक्रमजी वर्मा (२१०००/-), विनयजी कोडगीरवार (२१०००/ -), विजयजी जयस्वाल ( ११०००/- ), किशोरचंदजी भंडारी (११०००/-), डॉ.सुजीतजी चिन्नावार ( ११०००/ -), अमोलजी भानुदास मामीडवार (११०००/-), आनंदरावजी चंद्रे (५१००/-), बाळु पाटील चंद्रे (५१००/-),डॉ. विजयजी कवडे (५०००/-), आणि प्रसाद पाटील चंद्रे (२१००/-) असा एकुण एक लाख आठ हजार तीनशे रूपयांचा समर्पण श्रध्दानिधी जमा झाला. हे अभियान एक महिना चालणार असुन प्रत्येक घरी जाऊन समर्पण श्रध्दानीधी जमा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगीतले.
या कार्यक्रमास ढाणकीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, तालुका संघचालक आनंदराव चंद्रे, ढाणकी न.पं. चे भाजपा गटनेते संतोष पुरी, नगरसेवक उमेश योगेवार, शिवसेना शहराध्यक्ष बंटी जाधव, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत देशमुख, दिगांबरजी बल्लेवार, विशाल इंगळे, पिंटू तोडतकर , गजानन चापके , अनिल गंगरपाड,सुनिल मांजरे, मंगेश चोरे, रुषी भागवत व सर्व ढाणकी शहर व्यापारी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.