Saturday, June 25, 2022
Homeयवतमाळजिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षीक निवडणूक

जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षीक निवडणूक

ग्रंथालय संघाच्या विभागीय प्रतिनिधी आनंद आडे

यवतमाळ : वाचन संस्कृती जोपासत ग्रंथालय चळवळ या तंत्रज्ञानाच्या युगातही प्रभावी पणे पुढे नेता यावी या दृष्टीने ग्रंथालय संघ महाराष्ट्र भर आहे. यवतमाळ जिल्ह्याची निवडणूक अँड.राजेंद्र गटलेवार यांच्या मार्गदर्शनात आज शारदाश्रम सार्वजनिक वाचनालय यवतमाळ येथे पार पडली. यामधे एकविस संचालकाचे मंडळ निवडण्यात आले. यामध्ये विभागीय प्रतिनिधी पदी आनंद आडे यांची निवड करण्यात आली.


सर्वानुमते अध्यक्ष म्हणून मनोज रणखांब, उपाध्यक्ष डॉ. अशोकराव फुटाणे, कार्यवाह विनोद देशपांडे सहकार्यवाह दिलीप कावळे, कोषाध्यक्ष म्हणून सुधाकर बाळबुधे, तर संचालक म्हणून प्रशांत पंचभाई, प्रा.राजेश चव्हाण, नागेश गांधे, राजेश खोडके, ज्योती सोनटक्के, सुजाता शेंडे, निखिल सायरे, सुरेश रामटेके, विठ्ठल डवले, गजानन कासावार, कुश राठोड, संजय डंभारे, राज्यप्रतिनिधी म्हणून प्रल्हादराव इंगळे, विभागाचे प्रतिनिधी म्हणून सचिन निलपवार,आनंद आडे व सुनिल रामटेके यांची निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकारी निवड सर्वानुमते झाली.मावळते अध्यक्ष रा.रा.राउत यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विनोद देशपांडे, आभार, प्रशांत पंचभाई यांनी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular