दारव्हा : स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव हर्षोल्हासात वैचारीक प्रबोधनात्मक कार्यक्रमाव्दारे स्थानिक गजानन मंदिराचे सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.अवंती राऊत होत्या.प्रमुख पाहुण्या अर्चना ऊडाखे, डॉ.कोमल सांगाणी, डॉ.आश्विनी भेंडे व प्रमुख वक्त्या पल्लवी गोहाड उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली.जिजाऊ वंदन व कार्यक्रमाचे संचलन वंदना हरीश जाधव यांनी केले. प्रास्तावीक डॉ.कांचन किशोर नरवडे यांनी केले. प्रास्तावीक भाषणातुन डॉ.नरवडे यांनी जिजाऊंच्या अंधश्रध्दा विरोधी कार्याचा उल्लेख केला. शिवरायांनी पुणे येथील अंधश्रद्धा निदर्शक नांगर उखडून फेकण्यास शिवरायांना कसे प्रोत्साहीत केले त्याचा दाखला दिला.चुल आणी मुल ह्या गुलामीतुन महिलांना मुक्त करण्यासाठी मुलींकरीता पहिली शाळा उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही याप्रसंगी अभिवादन करण्यात आले. कु.आराध्या मुटकुळे, कु.नारायणी गव्हाणे या मुलींनी जिजाऊंची आकर्षक वेषभुषा करुन सर्वांचे लक्ष वेधले होते.ज्योती डोंगरे यांनी ‘जिजाऊ’ हा ऊत्कृष्ट एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व अध्यक्षांनी आपल्या भाषणातून स्त्रीमुक्ती चळवळीतील महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता आशा डोंगरे माजी नगरसेवक,अल्का कदम,किरण कदम,रीता भोंडे,चैताली मुटकुळे,अरुणा चव्हाण यांचेसह जिजाऊ ब्रिगेड, कुणबी महिला सखी मंच,मराठा महिला संघटन,अ.भा.माळी महिला संघ,तनिष्का ग्रुप, अहिल्याबाई होळकर ग्रुप,शौर्या बचतगट, आंध समाज महिला ग्रुप, महिला विहार समिती व्दारे परीश्रम घेण्यात आले.