Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळचना पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

चना पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

कोराजन औषधीची मोफत फवारणी

घाटंजी : खरीप हंगाम संपताच शेतक-यांनी रब्बी हंगामातील पिक घेत आहे. शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात चन्याची लागवड केली आहे. अगोदरच शेतकरी संकटात असतांना चन्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकावरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोराजन कीटकनाशक औषधीची फवारणी करण्यात आली.

    यवतमाळ जिल्ह्यातसह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चना पिकाची पेरणी झाली आहे. वातावरणाच्या बदलामुळे पिकामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. चना पिकावर मर रोगाचे प्रमाण काही प्रमाणात असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच घाटेअळी ही पिकावर जोर करत असल्याने त्याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. तसेच आज चना हे पिक काही प्रमाणात फुलोरा अवस्थेत व गाठी अवस्थेत असल्याने ढगाळ वातावरण तसेच रात्रीच्या तापमानात होत असलेली घट यामुळे अळीच्या वातावरणास हे पोषक वातावरण असून अळीपासून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.  वारंवार बदललेले वातावरण हे पिकास योग्य असते असे नाही तेव्हा फुलोर या अवस्थेमध्ये असलेल्या चण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  कारण या किडीच्या मादी या पतंग कळ्या व फुले यावर अंडी घालतात यासाठी एफएमसी केमिकल कंपनी ने मोफत प्रत्येक गावांमध्ये फुलोरा अवस्थेत अनेक शेतकऱ्यांना कोराजन या औषधीचे प्रात्यक्षिक दिले आहे.

फुल अवस्थेमध्ये जर कोराजन ही औषधी आपण वापरल्यास 100% फायदा होऊ शकतो यासाठी कंपनीचे प्रतिनिधी काही गावांमध्ये फुलोराअवस्थेवर चना या पिकावर फवारणी करीत आहे. निदान गावातील 6 ते 10 शेतकऱ्यांना याचे मार्गदर्शन देत आहे. ही औषधी मोफत फवारणी करून त्यांना चना पिकावरील माहिती देण्याचे काम हे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एफ एम सी चे प्रतिनिधी करीत आहे. कारण कोराजन हे औषध अंडी व अळी नाशक असल्याने हे चना पिकावर चांगल्या प्रकारे काम करते यात शेतकऱ्यां चे समाधान होते असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular