कांचन शेळके यांचा गीत गायनामधून संदेश
महागाव : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी शिवबांना घडविले, आणि शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आता घराघरात मॉ साहेबांचा आदर्श घेऊन नव्या जिजाऊंनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन कांचन शेळके यांनी केले.

येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात जिजामाता जयंती निमित्त प्रबोधन आणि अभिवादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोवाडे आणि प्रबोधनपर गीतांमधून कांचन शेळके यांनी मार्गदर्शन केले. हिवरा येथील शाहीर विनोद बोरूळकर यांनी सादर केलेले पोवाडे व गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. जिजाऊ ग्रुप, अष्टविनायक गणेश मंडळ व मराठा सेवा संघाच्या वतीने हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संभाजीराव नरवाडे,रामराव पाटील नरवाडे, शैलेश कोपरकर, अनिल नरवाडे, जयश्रीताई नरवाडे, उदय नरवाडे, नारायण शिरबिरे, बाबाराव पाटील, दिगंबर गाडबैलै, राजू राठोड, देविदास गावंडे, डॉ. संदीप शिंदे, संजय नरवाडे यांच्या हस्ते जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिजाऊ उत्सव समितीचे बाळू पाटील नरवाडे ,रवी कोपरकर ,नारायण शिरबिरे, श्रीकांत राऊत ,सुरज धोंगडे, विनोद गावंडे, यज्ञेश गाडबैलै, अक्षय कोपरकर प्रभाकर गाडबैले यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. संदीप शिंदे व संजय नरवाडे यांनी केले तर आभार शैलेश कोपरकर यांनी मानले.