घाटंजी : स्थानिक नेहरू नगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने राहत्या घरी रात्री घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली २४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान उघडकीस आली.

सुरेखा कैलास पलकंडवार (३७) असे मृतक महिलेचे नाव आहे. 24 जानेवारीला नेहमी प्रमाणे मुलगी उठली असता तिला तिची आई गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसली. तेव्हा मुलीने आरडाओरडा केली असता बाजूच्या घरातील नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली त्यानंतर घाटंजी पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविला. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.