यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनच्या प्रयत्नांना यश
यवतमाळ : जिल्ह्यातील वर्ग ९ ते १२ चे खाजगी क्लासेस, नियम व अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून सुरु करण्याची परवानगी दिली. क्लास संचालकांचे गेले 10 महिने बंद असलेले सर्वप्रकारचे क्लासेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन सलग्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टिचर्स असोसिएश क्लासेस सुरु व्हावेत म्हणून सतत प्रयत्न करीत होती. शेवटी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे परिश्रम कामी आले.

कोरोणामुळे १६ मार्च पासून जिल्ह्याभरातील शिकवणी वर्ग बंद ठेवले होते. शिकवणी वर्ग संचालक आर्थिक विवंचनेत सापडलेला होता.सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद असल्यामुळे शिकवणी वर्गाचे भाडे , घरभाडे, विजबिल, बॅक हप्ते भरणे कठीण जात होते. जिल्ह्यातील पालकांची नाजुक आर्थिक परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ऑनलाईन क्लासेस सुद्धा कुचकामी ठरलेले होते . ग्रामीण भागात ९०% पालक स्मार्ट फोन घेऊ शकत नाही. एखाद्या पालकांजळ फोन असते तर नेटवर्क नसते. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालक, विद्यर्थी आणि शिकवणी वर्ग संचालक, मागील 10 महिण्यापासून बंद असलेले क्लासेस सुरु होण्याची वाट बघत होते. सदर बाब यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना वारंवार भेटून निदर्शनात आणून दिली. जिल्हाधिकारी यांनी बेरोजगारीवर मात करुन स्वयंरोजगार निर्माण केलेल्या शिकवणी वर्ग संचालकांची परिस्थिती लक्षात घेऊन शिकवणी वर्ग सुरु करण्याचे आदेश काढले. विदर्भ विभागीय अध्यक्ष, योगीराज अरसोड , जिल्हाध्यक्ष संजय पवार , मार्गदर्शक अनिल चिंचोळकर, उपाध्यक्ष शैलेश दुबे , सचिव योगेंद्र भुसे, संघटक मोहनशिंह शेर, संदीप देवपारे, चंद्रशेखर आष्टेकर, संदीप चिंतलवार,राजकुमार राठी , आनंद विधाते, विकास वेणुरकर, प्रवीण शेटे, विनोद भोसले , राम राठी अस्मिता वैद्य, अंजली माटे ,भक्ती शेनमारे, मेघा भास्करवार , विद्या नरहर शेट्टीवर यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.