घाटंजी : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा यवतमाळ तर्फे आयोजित सावित्रीची लेक हा जिल्हा स्तरिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

त्यात विद्यार्थीच्या गुणवंत विकासासाठी तसेच सामाजिक तळमळतेची जाणीव असणाऱ्या सावित्रीच्या लेकीचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती घाटंजी अंतर्गत जि. प. शाळा पारधीबेडा येथील शिक्षिका कुसुम गंगारामजी गद्दलवार यांना सण २०२०-२०२१ वर्षीच्या सावित्रीची लेक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव सोहळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सोळा शिक्षिकाणा सावित्री ची लेक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षन अधिकारी प्रमोद सुरवंशी, डॉ प्रशांत गावंडे अधिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण संस्था अमरावती, ज्योती भोंडे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जि प यवतमाळ, शुभांगी आगासे पोलीस उपनिरीक्षक, प्रा मधुकर काठोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यवतमाळ यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे संचालन सारिका हजारे तर आभार सीमा मुनगीनवार यांनी केले. शिक्षिका कुसुम गद्दवार यांनी पारवा येथील पारधीबेडा शाळेत कार्यरत आहे. अतिशय गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असून सामाजिक उपयोगी कार्य करत असल्याने त्यांना दिलेल्या सावित्रीची लेक पुरस्कार चे कौतुक पंचायत समिती उपसभापती सुहास पारवेकर, गटशिक्षणाधिकारी प्रवीण कांबळे, ग्राम पंचायत सरपंच अर्चना कुरपते, उपसरपंच अर्जुन आत्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरिता रवींद्र पवार, मुख्यध्यापिका करुणा डगवार व जि.प.शाळा मुले व मुली पारवा शाळेतील सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका प्रशांत भेदूरकर, दीपक महाकुलकर आदींनी तिचे कौतुक केले आहे.