यवतमाळ : जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या कारला अपघात झाला.
यवतमाळ – नागपूर रोडने जात असतांना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही प्राणहाण झाली नाही.

आमदार डॉ वजाहत मिर्झा हे आपल्या एम.एच. ३१ एफ आर ३७८६ क्रमांकाच्या कारने यवतमाळवरुन नागपूर कडे जात होते. पाढरकवडा बायपास नजीक काकाच्या ढाब्या जवळ एम.एच. २९ बी सी ४१०६ क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा जोरदार होता की वाहनांचा चुराडा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेवून, जखमींना येथील रुग्णालयात दाखल केले.