Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळआक्षेपार्ह लिखाणाच्या निषेधार्थ बंजारा समाजात संताप

आक्षेपार्ह लिखाणाच्या निषेधार्थ बंजारा समाजात संताप

नेमाडे यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी

घाटंजी : बंजारा समाजातील विविध संघटनेच्या वतीने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या आक्षेपार्ह लिखाना विरोधात तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.


लेखक,भालचंद्र वनाजी नेमाडे यांनी लिहलेल्या ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’या कादंबरीत बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लिखाण हे जाणीवपूर्वक केल्याबद्दल या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशक, हर्ष भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई या दोघांवर शासनातर्फे गुन्हा दाखल करून या कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आनावे व लेखकाला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी,भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था, राष्ट्रीय बंजारा टायगर्स, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, गोर सेना, राष्ट्रीय बंजारा परिषद, इत्यादी संघटनेचे नामदेवराव आडे, सुधाकर राठोड, वामन राठोड, अरविंद जाधव, रवि आडे, कैलास राठोड, गणेश राठोड, सुनील जाधव, बंडू जाधव, राजू चव्हाण, संजय आडे, विजय राठोड, सुरेश पवार, संदीप जाधव, सचिन राठोड, संजय जाधव सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular