वणी : जमात- ए- इस्लामी हिंद वणीच्या वतीने आस्वाद हॉटेल इथे ‘अंधारातून प्रकाशाकडे’ जमात ए इस्लामी हिन्द महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि.तौफीक असलम हे उपस्थित होते. प्रमुख वक़्ते प्रा.वाजिद अली खान, प्रमुख पाहुणे वैभव जाधव पोलिस निरीक्षक,वणी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आले. सत्कार मूर्ति जब्बर चीनी, राजू धावंज़ेवार ,अजय कडेवार, संदीप बेसरकर, मुशताक लोनारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वणी भूषण अजय गोदलावार भारतीय आर्मी जवान अमेरिकेला शांतीदूत म्हणून कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज़िया अहेमद, प्रास्तविक डॉ सय्यद अतीक, आभर डॉ. अरशद शाह यांनी केले. यशस्वीतेसाठी सलीम अंसारी , ज़ाकिर भाई , शेख सलीम , सय्यद यूनुस, ज़मीर शेख, शकील शेख, आयफाज भाई यांनी परिश्रम केले.