Tuesday, June 28, 2022
Homeमुंबईविनाअनुदानित शिक्षकांचे हक्काच्या पगारासाठी आझाद मैदान मुंबई येथे दि.२९/०१/२०२१ पासून आंदोलन सुरू

विनाअनुदानित शिक्षकांचे हक्काच्या पगारासाठी आझाद मैदान मुंबई येथे दि.२९/०१/२०२१ पासून आंदोलन सुरू


मुंबई:- राज्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांचें कडून दि.२९ जानेवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे पगारासाठी जबाब दो आंदोलनं छेडण्यात आले आहे.

यात प्रामुख्याने १) १३/०९/२०१९ शा. निर्णय नुसार अनुदान मंजुर २०% व वाढिव ४० % वेतनाचा निधी प्रचलित धोरणानुसार वितरित करण्याचा आदेश निर्गमित करणे. २) अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व नैसर्गिक तुकड्या निधी सह घोषित करणे. ३) सेवा संरक्षण सह वैद्यकीय परिपुर्ती योजना लागू करणे. ४) १ एप्रिल २०१९ पासुन चे वेतन अदा करण्याचा शासन आदेश निर्गमित करणे. या प्रमुख मागणीसाठी दि. २९ जानेवारी पासून २००० वर शिक्षक उपस्थित असुन येत्या दोन-तीन दिवसांत २० हजार च्या वर शिक्षक आझाद मैदान गाठणार आहे. तरी शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी शिक्षक समन्वय संघ कडून करण्यात आली. या वेळी प् प्रा. महेंद्र वाडेकर प्रा. धिरज ठाकुर , नितीन बाराहाते , सुरेश गावंडे, दिपक गोमासे, आश्विन इंगोले, उमेश मसाळ, प्रा.परसराम राठोड, प्रदिप देशमाने यांनी आंदोलनात सहभाग नोंदवुन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

Previous article03/02/2021
Next article04/02/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular