Tuesday, June 28, 2022
Homeमहाराष्ट्र"युथ आयकॉन अवॉर्ड-2021" ने उदयकुमार पगाडे सन्मानित

“युथ आयकॉन अवॉर्ड-2021” ने उदयकुमार पगाडे सन्मानित*नॅशनल ह्यूमन वेलफेअर कॉन्सिल, दिल्ली मार्फत विशेष सत्कार*


नॅशनल ह्यूमन वेलफेअर कौन्सिल, दिल्ली या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यात प्रथमच उपराजधानी नागपूर शहरात ४ जुलै २०२१ रोजी रविवारला, महाराष्ट्र युवा संमेलनात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निवडक लोकांना सन्मानित केल्या गेले.


यात, चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी, मागील ६ वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असलेले उदयकुमार पगाडे यांना संस्थेचे चेअरमन श्री.गुंजन शर्मा सर आणि इतर अन्य मान्यवरांच्या हस्ते “युथ आयकॉन अवॉर्ड-२०२१” हा पुरस्कार देत गौरव करण्यात आले.आजवर यांनी विदर्भातील बहुसंख्य रुग्णांना रक्ताची मदत, गाव खेड्यातील लोकांना अनेक विषयांवर मार्गदर्शन व मदत, वृक्षारोपण उपक्रम, कोरोना काळात गरजू लोकांना धान्य किट, मास्क, सॅनिटायजरचे वाटप, आणि ईतरही अनेक लहान मोठे उपयुक्त कार्य करीत समाजात निःस्वार्थ मदत केलेले आहे. यांना सन्मान स्वरूपात ट्रॉफी, सर्टिफिकेट, मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यांच्या कार्याला विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्रॉत झालेले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular