झरप येथे रेकॉर्डब्रेक लसीकरण
लाखनी :

कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिबंधाकरिता लसीकरण आवश्यक असले तरी काही गैरसमजामध्ये तालुका प्रशासनाने प्रचार प्रसार करूनही ग्रामीण जनता तयार होत नव्हती. पण गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव , समन्वयक नरेश नवखरे , तलाठी खेमराज मेश्राम यांनी झरप येथे जाऊन ग्रामपंचायत कमिटी , अंगणवाडी सेविका , आशा कार्यकर्ती व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन लसिकरणाबाबद माहिती दिली. व गावकऱ्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्याच्या सूचना दिल्या. सरपंच जगदीश भोयार , ग्रामसेवक हितेंद्र बारस्कर , उपसरपंच अस्मिता चचाने , ग्रामपंचायत सदस्य वैशाली हेमने , धम्मदिप खोब्रागडे , ममता कोरे , अश्विनी बावणे , पद्माकर कोरे , अंगणवाडी सेविका मंगला खोब्रागडे , आशा कार्यकर्ती कुसुम नंदागवळी यांना काही कुटुंबांची जबाबदारी वाटून देण्यात आली. त्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडून गावकऱ्यांना लसीकरणास प्रवृत्त केले. झरप येथील लोकसंख्या ७३० असून ग्रामपंचायत कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहन मरसकोल्हे यांचे मार्गदर्शनात डॉ. सुशील शेंडे आरोग्य सेविका मदनकर , सहाय्यक रत्नदीप चकधरे , यांचे पथकाव्दारे लसीकरण कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३४० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३२५ व्यक्तींनी प्रथम तर १५ व्यक्तींनी दुसरा डोज घेतला. संगणक परिचालक अजय हेमने , शेखर धोटे व संदीप कठाने यांनी नोंदणी करिता सहकार्य केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचे तथा राष्ट्रीय कार्यात सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय ग्रामपंचायत मोगरा येथे ३२१ आणि कवलेवाडा येथे ४०३ व्यक्तींनी रेकॉर्डब्रेक लसीकरण केले आहे.