लाखनी :-

केसलवाडा/वाघ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद राऊत यांच्या हस्ते १ जुलै रोज गुरुवार ला हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक यांना आय. डी. ए. गोळ्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी हत्तीरोगाच्या आरोग्य कर्मचाऱ्यासमक्ष गोळ्या खाऊन देश हत्तीरोग मुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. राखडे , पर्यवेक्षक आर. टी. नागलवाडे , औषध निर्माता जी. एम. सावरबांधे , आरोग्य सेविका एस. एम. सोनवाणे , अस्मिता वासनिक , नलिनी गायधनी , ममता पाटेकर तथा परिचर सोनेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. गावकऱ्यांना हत्तीरोगाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. या मोहिमेला जनतेनेही योग्य तो प्रतिसाद दर्शविला.