Saturday, June 25, 2022
Homeभंडारासार्वभौम युवा मंच कडून मंडल दिन साजरा

सार्वभौम युवा मंच कडून मंडल दिन साजरा

लाखनी :
येथील सार्वभौम युवा मंच जिल्हा भंडारा चे वतीने 07 ऑगस्ट रोजी मंडल आयोग दिन , जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1990 साली तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ह्याच दिवशी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी प्रवर्गाला 27% आरक्षण जाहीर केलं होतं.


त्या ऐतिहासिक निर्णयाला 31 वर्षे पूर्ण झाली. ह्या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने लाखनी पंचायत समिती च्या सभागृहात मंडल आयोग दिन साजरा करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमने , नायब तहसीलदार उरकुडकर , तर विशेष अतिथी पोलिस उपनिरीक्षक गौरी उके उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी ओबीसी जनगणना परिषदेचे भंडारा जिल्हा समन्वयक प्रा. उमेश सिंगनजुडे , सरकारी वकील ऍड.निलम वैद्य , ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत , कवी व लेखक प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे , नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन चे जिल्हा सचिव मुकेश धुर्वे उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थितीत मान्यवरांनी मंडल आयोग दीन , जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिना संबंधात सविस्तर माहिती दिली. ह्या प्रसंगी शकुंतला बहुद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर नृत्य सादर करून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्र संचालन सार्वभौम युवा मंच च्या संघटिका अश्विनी भिवगडे , प्रास्ताविक अध्यक्ष दीपक जनबंधू तर आभार उपाध्यक्ष जयंद्र देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय रंगारी , नेहाल कांबळे , मंगेश गेडाम , प्रांजल लांडगे , पवन गजभिये , सचिन रामटेके , सोहेल खान , राकेश वंजारी , चेतन निर्वाण , विश्वजित हुमणे , सौरभ मेश्राम , योगेश कांबळे , प्रीती खोब्रागडे , शर्वरी भीवगडे , प्रांजली खोब्रागडे , अश्विनी लेंढारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular