भंडारा :
ग्रामसभा हे सामान्य नागरिकांच्या सोईनुसार ठेवण्यात यावी याकरिता आदर्श युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत गणेशपुर चे ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन दिले.

ग्राम गणेशपूर येथील ग्राम सभा दिनांक ३१/०५/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता ठेवण्यात आलेली होती. सदर सभा ग्रामपंचायत ने आपल्या सोईने ठेवली असे आदर्श युवा मंच च्या लक्षात आले. उन्हाळाची वेळ असल्याने भर दुपारी १२.०० वाजता आम सभा ठेवली असुन आम सभेला लोक आलेले नव्हते. जनतेसाठी ग्रामसभा असते त्यांचे प्रश्न त्यांचे समस्या निवारण करणे अनेक असे मुददे घेवुन जनता आपली व्यथा मांडते मात्र ग्राम पंचायत मासिक सभेच्या सारखेच ग्राम सभेचे देखील नियोजन दिसुन आले. नागरिकांना ग्रामसभेत त्यांचे प्रश्न मांडता यावे याकरिता ग्रामसभेचा वेळ ११ वाजता पर्यंत ठेवुन नागरिकांच्या सोईनुसार सुट्टीचा दिवशी ठेवावेत जेणे करूण प्रत्येक कष्ट करणारी मजूर वर्ग आणि नोकरी करणारे ग्रामस्थ व्यक्ती देखील आपले प्रश्न मांडु शकेल. असी मागणी आदर्श युवा मंच तर्फे निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देताना आदर्श युवा मंच जिल्हा भंडारा अध्यक्ष श्री मते, श्री लुकेश जोध, सौरभ साखरकर, चिराग गुरनुले आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.