Sunday, May 28, 2023
Homeभंडाराविद्युत करंटने ठार नर बिबटयास फेकले बोडीत

विद्युत करंटने ठार नर बिबटयास फेकले बोडीत

कोका येथील घटना ; भंडारा वन विभागात उडाली खळबळ
विलास केजरकर
भंडारा :-
भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कोका गावाबाहेरील बोडीत एका सहा वर्षीय नर बिबटयाचा मृतदेह आढळून येताच भंडारा वन विभागात खळबळ उडाली. प्रकरणी विश्रामगृहात परिसरात शवविच्छेन व दाह संस्कार करण्यात आले. बिबटयाचा मृत्यू झालेला असून मृतदेह शेतशिवारातून बोडीत आणून फेकल्याचे निष्पन्न झाल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी सांगितले.
सोमवारला सकाळच्या दरम्यान कोका गावाजवळील बोडीत पाळीशेजारी एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच गावक-यांनी एकच गर्दी करत बोडीच्या दिशेने जात असल्याचे वनाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. वरिष्ठांना माहिती देताच वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. साकोली वन्यजीव कार्यालयातून डॉग स्कॉटला प्राचारण करण्यात आले. बोडी शेजारील शेतशिवारात शोध मोहिम राबविण्यात आली.

बिबट्याच्या मृतदेहाला कोका येथील वन विश्रामगृहात हलविण्यात आले. त्यावेळी लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके व मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर परिसरातच दाह संस्कार करण्यात आले.
घटना स्थळावर भंडाराचे वनसंरक्षक एस. बी. भलावी, सहाय्यक उपवनसंरक्षक एस.एन. शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नागदेवे, वनरक्षक तिरपूडे, कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी आर. पी. धनविज व वन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘मृत बिबट हा नर जातीचा असून ५ ते ६ वर्षाचा आहे. कोका गाना शेजारील बोडी लगत शेतशिवार असून विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. शिकारीच्या शोधात बिबट असतांना छाती व अन्य भागास विद्युत करंट लागल्याने तो जागीच ठार झाला. घटना अंगावर येवू नये म्हणून अज्ञातांनी बिबट्याच्या मृतदेहास बोडीत आणून फेकल्याचा अंदाज आहे.’
-डॉ. गणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी लाखनी.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular