*महामार्ग पोलिस केंद्र गडेगांवचा स्तुत्य उपक्रम
लाखनी :- नवीन वर्षाचे औचित्य साधून वाहतुकीची नियम पाळणा-या वाहन चालकांंचा महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांचे हस्ते गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे, नितीन आगाशे आणि सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) भुषणकुमार उपाध्याय, पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर, उपअधिक्षक संजय पांडे, पोलिस निरीक्षक वैशाली वैरागडे यांचे मार्गदर्शनात गडेगांवचे (लाखनी) महामार्ग पोलिस केंद्राचे सपोनी प्रमोद बघेले यांचे हस्ते, पोउपनी अमित पांडे, नितीन आगासे यांचे उपस्थितीत जे वाहन चालक योग्य लेनने वाहन चालवितात, हेल्मेटचा वापर करून दुचाकी चालवतात, चारचाकी वाहन चालक सिटबेल्ट लावुन वाहन चालवतात तथा वेगमर्यादेचे पालन करुन वाहन चालवितात अशा दुचाकी, चारचाकी व रुग्णवाहिका चालकांंचा गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला तथा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवुन येणारे वर्ष सुखसमृध्दी व भरभराटीचे जावो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या, यावेळी महामार्ग पोलिस केंद्रात कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.