Friday, June 9, 2023
Homeभंडारालसीकरण मोहिमेत उमेद स्वयंसहाय्यता समूहाचे योगदान महत्वाचे

लसीकरण मोहिमेत उमेद स्वयंसहाय्यता समूहाचे योगदान महत्वाचे

विमा सुरक्षा कवच नसतांना केले काम
लाखनी :
कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीकरण असले तरी काही अफवांमुळे ग्रामीण जनतेत संभ्रम निर्माण झाल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांचे आवाहनावरून उमेद स्वयंसहाय्यता समूहातील सखींनी वीमा सुरक्षा कवच नसतांना घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन केल्यामुळे लसीकरणाच्या वेग वाढून उद्दिष्टपूर्ती होणार आहे.


फेब्रुवारी २०२० पासून कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूचे प्रकोपामुळे अर्थचक्र कोलमडले. गर्दीचे ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाकडून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे उद्योगधंदे , शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बालकं प्राथमिक शिक्षणापासून वंचित झाले. मार्च २०२१ मध्ये कोरोणाच्या भयावह दुसऱ्या लाटेने लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला. पण यावर कसलीही औषध उपलब्ध नसले तरी कोव्हीशिल्ड अथवा कोव्ह्याक्षीन लसीकरण करणे. हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला. पण समाज माध्यमांवर काही चुकीच्या अफवा प्रसारित झाल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला. ग्राम पातळीवर आरोग्य विभागामार्फत लावण्यात आलेल्या लसीकरण कॅम्प ला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे प्रशासनासमोर यक्षप्रश्न उभा ठाकला. ग्रामीण जनतेच्या मतपरिवर्तनाची जबाबदारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांचेवर सोपविण्यात आली. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी ग्राम पातळीवर काम करणारे तलाठी , ग्रामसेवक , सरपंच , उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहातील वर्धीनी , समूह संसाधन व्यक्ती ग्रामसंघ लेखापाल , बँक सखी , साक्षरता सखी , कृषी सखी , मत्स्य सखी , पशू सखी , अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा स्वयंसेविका तथा गावातील गणमान्य व्यक्तींची बैठक घेऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन करण्याच्या सूचना केल्या. उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कसलेही विमा सुरक्षा कवच नसतांना घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व समजावून ग्रामीण जनतेचे मतपरिवर्तन करून लसीकरणास प्रवृत्त केले. मोगरा येथील दीपा मेश्राम , सुनीता पडोळे , प्रिया सार्वे , अंगणवाडी मदतनीस दीक्षा खांडेकर यांचेसह तालुक्यातील सर्वच गावातील उमेद स्वयंसहाय्यता महिला समुहांनी पुढाकार घेऊन सहकार्य केल्यामुळे लसीकरणाच्या वेग वाढला व उद्दिष्टपूर्ती होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular