**घटनास्थळावरुन मिळाले ट्रॅक्टरभर मिळाले तारांचे जाळे
गोंदिया :
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट बिटातील कक्ष क्रमांक 254 मध्ये 13 जानेवारी रोजी पट्टेदार वाघाचा मृतदेह दात व नखे कापलेल्या स्थि तीत आढळला होता. याप्रकरणी पाच आरोपींना पीं 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून 17 जानेवारी रो जी अर्जुनी मोर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी त्यांना 21 जानेवार पर्यंत वनकोठडी ठोठावली आहे. विशेष म्हणजे, वनविभागाला घटनास्थळ परिसरातून ट्रॅक्टरभर तारांचे जाळे मिळाले आहेत.
अर्जुनी मोर वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट बीट कक्ष क्रमांक 254 मध्ये वन कर्मचारी व वन मजूर गुरुवारी सकाळी गस्तीवर असताना त्यांना पट्टेदार वाघाचा जबडा व नखे गायब असलेला मृतदेह आढळला होता. विद्यु त शॉक लावून या वाघाची शिकार करण्यात आली असावी प्राथमिक अंदाज घटनास्थळी उपस्थित अधिकार्यांनी वर्तवला होता. वाघाचे शवविच्छेदन करून नमुने घेण्यात आले. शवविच्छेदनातून घेतलेले नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान वन विभागाने घटनास्थळ परिसरात शोधमोहिम राबविली असता ठिकठिकाणी विद्यु त तारांचे जाळे आढळून आले. दरम्यान, तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने 16 जानेवारी रोजी पाच आरोपींना पीं ताब्यात घेतले. त्यांना 17 जानेवारी रोजी अर्जुनी मोर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकार्यां समोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 21 जानेवारी पर्यंत वनकोठडी ठोठावली आहे. वन आणि वन्यजीव विभाग सर्वच बाबींची बीं शक्यता पडताळून पाहत असून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक कुलराजसिंह, सहायक वनसंरक्षक सदगीर यांच्या मार्गदर्शनात अर्जुनी मोरचे वनपरिक्षेत्राधिकारी बी. टी. दुर्गे व क्षेत्र सहायक यू. पी. गोटाफोडे करीत आहेत.