पवन मस्के यांच्या कामाला यश; अनेकांनी केले अभिनंदन
भंडारा :-
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात असलेल्या गणेशपुर , पिंडकेपार, कोरंबी या गावांना जोडणारा रस्ता तयार करण्यात आला. मात्र दोन ते तीन महिने लोटुन सुद्धा गेले व रोडपासून जमिनीचा अंतर खूपच मोठा असल्याने कोणत्याही वाहनाने जाणे म्हणजेच अपघाताला तोंड सतत द्यावे लागत होते. सदर शेतकरी व नागरिक तसेच व्यापारी वर्गाने जनसेवक पवन मस्के यांच्याकडे तक्रार करताच सातत्याने पाठपुरावा केल्याने संबंधित विभागातील अधिकारी इंजिनीयर यांनी दखल घेऊन रस्त्यावर मुरूम घालून व साईडला पिचिंग दगड करत तीन दिवसात कामाला वेग आलेला आहे.

आणि कामाला सुरुवात झालेली आहे आता पिडकेपार, गनेशपुर, कोरंभी देवी व अन्य गावातील नागरिकांना अपघाताला तोंड द्यावे लागणार नाही याकरिता पवन भाऊ मस्के भाजप सदस्य यांचे शेतकरी व नागरिकांनी आभार मानले आहे.त्यावेळी पवन मस्के, योगेश बोरकर, अशोक खोब्रागडे, गौरव मस्के, श्याम उके, गजू मेहर प्रमोद साठवणे, दिलीप साठवणे, दिलीप रुद्रकार, रामा शेंडे, बाळा मारबते, माणिक आंबीलढुके, योगेश बोरकर, सुरेश सूर्यवंशी, प्रवीण मेहर इत्यादी कार्यकर्ते व्यापारी वर्ग उपस्थित होते.