Sunday, May 29, 2022
Homeभंडारामानेगाव / सडक परिसरात बिबट्याची दहशत

मानेगाव / सडक परिसरात बिबट्याची दहशत

लाखनी :


तालुक्यातील मानेगाव/ सडक परिसरातील पटाचे दानीवरील अशोका बिल्डकॉन कंपनीच्या वर्कशॉमध्ये बिबट दडून बसला असल्याची वार्ता गावात पसरताच गावातील १५० ते २०० नागरिकांनी शनिवारी (ता. ४ ) रात्रदरम्यान अशोका बिल्डकॉन प्लांट परिसर गाठले. बिबट्याच्या तावडीत कुणी सापडू नये म्हणून गावातील मुख्य चौकात असलेल्या हनुमान मंदिरातून घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बिबट्यामुळे परिसरातील लाखोरी, आलेसुर , बोरगाव, राजेगाव येथील जनतेला बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याबाबद वन विभागास माहिती देण्यात आली. साकोली चे सहाय्यक वनसंरक्षक आर. पी. राठोड , लाखनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले , वनरक्षक शहारे मॅडम , रंगारी मॅडम , राऊत मॅडम , सोनटक्के , कावळे यांनी घटना स्थळ गाठून फटाके फोडले व बिबट्यास जंगलाचे दिशेने रवाना करण्यात आले असले तरी वनक्षेत्र सोडून बिबट आबादीमध्ये येत असल्याने मानेगाव/सडक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण आले आहे. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा. अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular