लाखांदूर :
अचानक रस्त्यावर आलेल्या माकडाची दुचाकीला धडक लागून अपघात झाल्याची घटना चप्राडपहाडी जवळ 23 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालकसह दोन महिला जखमी झाल्या.

कुरखेडा येथील रहिवासी सत्यवान संभा पोगळे (50) हे आपल्या पत्नी व महिला नातेवाईकांसोबत स्वःगावावरून लाखांदूरकडे येत असताना चप्राडपहाडी जवळ अचानक मोटारसायकल समोर माकड आडवा आला. त्यामुळे दुचाकीवरून चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात चालक सत्यवान संभा पोगळे त्यांची पत्नी पुष्पा पोगळे (45) व विमल बाबुराव लेदे (52) रा. पौना हे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन सर्व जखमींना मीं लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.