• उप मु. का.अ. सचिन पानझोडे यांनी दिले आश्वासन
• सर्व मागण्या पुर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही
भंडारा :

जिल्हा परीषदेसमोर सुरू असलेल्या महिला परीचरांच्या बेमुदत धरणे आंदोलनातील पाच मागण्या जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पानझोडे यांनी मान्य केल्या असून सदर मागण्या लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन जनसेवक पवन मस्के यांच्या नेतृत्चात उपस्थित असलेल्या महिला परीचरांना दिले आहे. मागण्या मान्य झाल्याने पवन मस्के यांच्या प्रयत्नांना यश आले असून महिला परीचरांनी त्यांचे आभार मानले. मात्र जोपर्यंत सर्वच्या सर्व मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महिला परिचारिका यांनी सांगितले आहे.
सोमवार दि. २६ जुलै पासून जिल्ह्यातील महिला परीचरांनी जिल्हा परीषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. तसेच जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील से जाहिर करण्यात आला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. सदर आंदोलनात महिला परीचरांना किमान वेतन देण्यात यावे, महिला परीचरांना नियमित सेवेत कायम करावे, परीचरांना गणवेष व ओळखपत्र देण्यात यावे, कोविड भत्ता देण्यात यावे, परीचरांना व्यतिरिक्त मोबदला देण्यात यावे, पेंशन योजना लागू करावे, दरवर्षी गणवेष व भाऊबिज देण्यात यावे, मासिक मानधन दर महिन्याला ५ तारखेच्या आत देण्यात यावे, चारदी, बेडशिट पडदे धुलाई भत्ता देण्यात यावे व कार्यक्षेत्रात फिरती प्रवास भत्ता देण्यात यावे आदी १० मागण्या महिला परीचरांनी केल्या आहेत. त्यापैकी पाच मागण्या पवन मस्के यांच्या अथक प्रयत्नाने तसेच या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठपुरावा केल्याने जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पानझोडे यांच्या कॅबीनमध्ये जावून चर्चेअंती पानझोडे यांनी मान्य केल्या. या पाच मागण्या लवकरात लवकर पुर्ण केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. सदर मान्य करण्यात आलेल्या मागण्यापैकी ओळखपत्र, मास्क व सॅनिटायझर देण्यात येईल, गणवेश देण्यात येईल, वागणुकीच्या बाबद पत्र देण्यात येतील, मानधनच्या रकमेमध्ये जिल्हा वार्षिक निधीतुन रक्कम वाढचे प्रस्ताव दाखल करण्यात येतील आदी मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरीत मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलन कर्त्या परिचारिका यांनी सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी चर्चा करतेवेळी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के, जनसेवक भंडारा यांच्या पुढाकारात सविता हटवार सर चिटणीस ,माधुरी चोले उपाध्यक्ष,वीणा टीचकुले कोषाध्यक्ष, चंदा नदानवार जिल्हा अध्यक्ष स्नेहलता रामटेके, प्रेमलता मेश्राम, कविता उईके, मीना डोमळे, अंजु रामटेके, अंजु वैद्य, संगीता नगरकर, धमावती नंदेश्वर, सिंधू खोटेले, चीत्रा तिरपुडे, निरूता कोचे, दुर्गा गजबे, हिरा भेंडारकर आदी महिला परीचर तसेच आदर्श युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.