Friday, June 9, 2023
Homeभंडारामनरो हायस्कूल च्या जागेवर मालकी जिल्हा परिषदेचीच

मनरो हायस्कूल च्या जागेवर मालकी जिल्हा परिषदेचीच

भाजपा कडून अप प्रचाराचा केविलवाणा प्रयत्न
भंडारा :
विकासकाने शासनाकडून नियमाप्रमाणे सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळविल्यानंतर लाल बहादूर शास्त्री हायस्कूल(मनरो) पटांगणावर दुकानगाळे बांधकामास सुरुवात झाली. या वास्तूचा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल अशी अफवा पसरवून भाजपा कडून माजी विद्यार्थ्यांमार्फत कँडल मार्च काढण्यात आला. पण शहर वासियांना वस्तू स्थिती माहिती होताच आपली गोची होऊ नये याकरिता शनिवार(ता.२१) रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ती जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची नसल्याचा पिल्लू काढण्यात आला. पण आखीव पत्रिकेप्रमाने ती जागा मनरो शाळेची असल्याची नोंद आहे. मनरो शाळा जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्याच मालकीची असल्याचे दिसते. यावरून दुकानगाळे बांधकामाबाबद भाजपा अपप्रचार करीत आहे. यापासून शहर वासीयांना सावध होण्याची गरज आहे.


लाल बहादूर शास्त्री हायस्कूल प्रांगणात नियमानुसार सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन विकासक प्रभात कन्स्ट्रक्शन कंपनी भंडारा कडून दुकानगाळे बांधकामास प्रारंभ केला. यात नगर परिषद भंडारा चे ना हरकत प्रमाणपत्राचाही समावेश असला तरी खासदार तथा भंडारा चे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांचे नेतृत्वात जिल्हा भाजपा अध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे , आ. डॉ. परिणय फुके , माजी आमदार चरण वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत २१ ऑगस्ट रोजी सर्किट हाऊस भंडारा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ह्या शाळेस ऐतिहासिक वारसा असल्यामुळे वास्तू पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकानगाळे बांधकाम बंद करण्यात यावे. अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पत्रकारांना दिली. शहरात कोणतेही बांधकाम करतांना नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. २० लाख रुपये विकास निधी घेऊन दुकान गाळे बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेचा नकाशा व ना हरकत प्रमाणपत्र नगर परिषदेने दिले. त्यावर नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची स्वाक्षरी आहे. तसेच त्यांचे कुटुंबियांच्या मालकीचे सन्नी कन्स्ट्रक्शन कंपनी शर्यतीत होती. पण उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्याने खासदाराचा विकास विरोधी सुर दिसतो.
पत्रकार परिषदेत माजी आमदार चरण वाघमारे यांनी ज्या जागेत दुकानगाळे बांधकाम सुरू आहे. ती जागा जिल्हा परिषदेची नाही. असा जावईशोध लावला. आखीव पत्रिकेचे निरीक्षण केले असता मालक सरकार असून भोगवटदार मनरो हायस्कूल आहे. ही शाळा जिल्हा परिषदेचे अधिनस्त असून ग्रामविकास विभागाचे दिनांक १० मार्च २०२१ चे शासन निर्णयानुसार मालकी जिल्हा परिषदेचीच असल्याने पत्रकार परिषदेत केलेला आरोप खोटा ठरतो. शहर वासियांची दिशाभूल करून भाजपा ला काय साध्य करायचे आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. भाजपा ज्यांचे कसलेही राजकीय अस्तित्व नसलेले तसेच समाजात कवडीची किंमत नसलेल्यांना पकडुन नुसत्या उचापती चालवून विकास कामे बंद पाडण्याचे कारस्थान सन्नी कन्स्ट्रक्शन कडून चालविले जात असल्याच्या शहरात चर्च होत आहेत. खासदार महोदय हे स्वतः लोक प्रतिनिधी असताना जनतेची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते. या प्रकाराने त्यांचे वरील जनतेचा विश्वास उडाल्याचे स्पष्ट दिसते. शहरात अनेक मोक्याचे ठिकाणी त्यात नगर परिषद इमारतीत तथा शहराचे एकमेव बगीचा उरलेला असलेल्या मिस्किन टँक समोर दुकानगाळे बांधकाम करून बगीचा विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत ठरले. इकडे नगराध्यक्ष डोळेझाक का करतात. याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular