Saturday, June 25, 2022
Homeभंडाराभाजपचा ओबीसी विरुद्ध चे कट कटकारस्थान उघडे पडले : मोहन पंचभाई

भाजपचा ओबीसी विरुद्ध चे कट कटकारस्थान उघडे पडले : मोहन पंचभाई

भंडारा :
भाजपचे 12 आमदार पिठासिन अध्यक्ष श्री.भास्कर जाधव यांनी आज निलंबित केले.ही बातमी महत्वाची असली तरी या बातमी मागे भाजपचा नीच चेहरा लपता कामां नये.
राज्य सरकारने,ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेला इंपीरिकल डाटा केंद्राकडून लवकरात लवकर मिळावा यासाठी सभागृहात आज ठराव मांडला. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर OBC बांधवांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा ठराव होता.


विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारने,सत्तेत असताना OBC आरक्षणाच्या बाबतीत इंपेरिकल डेटा चे महत्व स्वतःच राज्याला समजावून सांगितले होते.या पार्श्वभूमीवर भाजपने आज याबाबतचा ठराव जसा ठाकरे सरकारने मांडल्या नंतर त्याला अनुमोदन देणे अपेक्षित होते.परंतु अनुमोदन तर सोडाच परंतु जागेवर यू टर्न घेत, भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.आणि इथच भाजपा भोंगळी झाली.सत्तेत असताना एक धोरण आणि पायउतार झाल्यावर दुसर धोरण,हा या लोकांचा मूळ स्वभाव आहे..! आज करोडो ओबीसी बांधवांच्या साठी राज्य सरकारने इंपरिकल डेटा च्या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला भाजपने नुसता विरोधच केला नाही तर आपला OBC बांधवांच्या विरुद्धचा चेहरा देखील दाखवून दिला.आणि सभागृहात अगदी नळावर भांडतात तसा, नंगानाच केला..!! आज ठाकरे सरकारने मोठ्या चातुर्याने,फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा OBC विरुद्धचा चेहरा राज्यातील जनतेसमोर उघडा पाडला…! असे मत राष्ट्रीय कांग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष डॉ. मोहन पंचभाई यांनी स्पष्ट केले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular