मोहाडी :
भंडारा : छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ डों येथे देवीच्या दर्शनासाठी जाताना भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मोहाडी तालुक्यातील निलज बुज येथील एक तरुण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघातशुक्रवारी दुपारी ३.३० वाजता गोंदिगों या जिल्ह्यातील सरांडी येथे राष्ट्री य महामार्गावर घडला. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या अपघाताने निलज गावावर शोककळा पसरली. नीलज येथील पाच मित्र डोंगरगढ डों येथे कारने जात होते. चालकाचे संतुलन बिघडल्याने कार झाडावर आढळली. त्यात रुपचंद पचघरे (36) हा जागीच ठार झाला. तर संतोष महादेव पचघरे (26), अक्षय माटे (26), गुड्डू कांबळे (30) व निलेश बांते गंभीर जखमी झाले. तिघांना शासकीय रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले व निलेशला गोंदिगों या येथे हलविण्यात असल्याचे सांगितले.