Saturday, June 25, 2022
Homeभंडाराभंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे पेट्रोल-डिझेल ,गॅस व खाद्य तेल...

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे पेट्रोल-डिझेल ,गॅस व खाद्य तेल दरवाढीचे निषेध व भाववाढ कमी करण्याबाबत . श्री नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांना मा.उपजिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती कमी असून सुद्धा केंद्र सरकार काही महिण्यापासून पेट्रोल ,डिझेल,गॅस ची सतत दरवाढ करत आहे,खाद्य तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत.

महागाई मुळे देशातील सामान्य जनता,शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे.


आधीच कोरोना मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत ,त्यात दिवसेंनदिवस पेट्रोल,डीझेल, गॅस व खाद्य तेलाच्या दरवाढी मुळे केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे,सदर दर वाढीचे निषेधार्थ भंडारा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा यशवंत सोंनकुसरे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले ,त्या वेळी त्यांचे सोबत आशिष दलाल,अश्विन बांगडकर,मयूर पंचबुद्धे,किरण वाघमारे,स्वप्नील नशीने,ऍड.नेहा शेंडे,शेखर गभने,हर्षल येळणे, हिमांशू मेंढे,नितीन तुमाणे,पियुष न्यायकरे,निशांत बुरडे,अवि हेडाऊ,रिझवान सय्यद,अमन मेश्राम,गीतेश कारेमोरे,विशाल भिवगडे,सुरेश कनोजे,शिल्पा शिंगाडे,मनीषा वलोकर,पद्मा देशकर,आशा आजबले, पौर्णिमा वाहने,आशीष शेख,शुभम बागडे,पिर्ती परेसे,खूषभू तिरपुडे,माही रंगारी, फार मोठया संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular