भंडारा :
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेला जगणे मुश्कील झाले आहे या जीवघेण्या महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. मोहनभाऊ पंचभाई यांच्या आदेशानुसार भंडारा तालुका व शहर काँग्रेसने आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या हैराण करणाऱ्या महागाईच्या विरोधात काँग्रेसची सायकल यात्रा दि.10 जुलै 2021 रोजी भंडारा तालुका व शहर काँग्रेसच्या नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल,गॅसच्या महागाईविरोधात सायकल यात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवावा असे निर्देश दिले आहेत .

या निमित्ताने दि.06 जुलै रोजी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता भंडारा तालुका अध्यक्ष श्री. प्यारेलालजी वाघमारे व शहर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष. श्री. प्रशांतजी देशकर यांनी विश्राम गृह भंडारा येथे ठीक दुपारी 4.00 वाजता काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.