Saturday, September 23, 2023
Homeभंडाराबोलोराच्या धडकेत चारजणी जखमी

बोलोराच्या धडकेत चारजणी जखमी

भंडारा :
भरधाव बोलेरोने एका कारला धडक दिल्याने चारजण गंभीर जखमी झाले. सदर घटना तालुक्यातील पाहुणी गावाजवळ दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. कार्तिक पनसोख (32), भाग्यश्री कार्तिक पनसोख (27), शारदा पनशोख सर्व राहणार भंडारा व दर्शना जाधव नागपूर अशी जखमींची मीं नावे आहेत.


भंडारा येथील पनसोख कुटुंबिय व दर्शना जाधव हे मौदा तालुक्यातील धर्मापुरी येथे कारने जात होते. दरम्यान भंडारा- खात मार्गावरील पाहुणी गावाजवळ समोरून आलेल्या बोलेरो जीप क्रमांक सीजी 40/एन.जे. 6191 ने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून चारजण जखमी झाले. अपघातानंतर बोलेरो चालक पसार झाला. याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा नोंदनों करण्यात आला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular

22/09/2023

21/09/2023

20/09/2023