Saturday, June 25, 2022
Homeभंडाराप्रहार अपंग क्रांतीच्या वतीने दिव्यांगांना ट्रायसिकल वाटप

प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने दिव्यांगांना ट्रायसिकल वाटप

लाखनी :– प्रहार अपंग क्रांती आंदोलन , भंडारा जिल्हा तालुका शाखा लाखनी च्या वतीने गरजू दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे(ट्रायसिकल) वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार मल्लीक विराणी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, जिल्हाध्यक्ष रवी मने, जिल्हासचिव योगेश्वर घाटबांधे, तालुकाध्यक्ष सुनील कहालकर, शहराध्यक्ष रामचंद्र निर्वाण उपस्थित होते.


याप्रसंगी तहसिलदार मल्लीक विराणी यांचे स्थानांतरण मौदा येथे झाल्यामुळे त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील चान्ना येथील विक्रांत मेश्राम, सावरी /मु येथील धनराज थोटे, सोमलवाडा येथील रामदास टिचकुले व लाखनी येथील राजेश्वर गायधनी यांचा समावेश आहे. गरजू दिव्यांगाना सायकल अभावी मोठ्या अडचनीचा सामना करावा लागत होता. याचे गांभीर्य लक्षात घेत संघटनेच्या वतीने पंचायत समिती सभागृहात तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी लाखनी तालुका सचिव सुनील हटवार, शहर सचिव प्रेमचंद निर्वाण, उपाध्यक्ष महेश घनमारे, रमेश गायधनी, विष्णुदास पडोळे, योगराज कांबळे आदि उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular