Saturday, June 25, 2022
Homeभंडाराप्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात कांचन कावळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात कांचन कावळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लाखनी:


लाखनी शहरात जवळपास दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम केलेले लाखनी शहरातील सुप्रसिद्ध सुवर्णकार श्री. कांचन कावळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखनी येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने नेहमीच देशहिताचा विचार केला आहे, एवढ्या कठीण काळात देखील काँग्रेसने सातत्याने लोकांचा, सामान्य जनतेचा विचार केला आहे. काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी, काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेस पुन्हा नवी उभारी घेत आहे, तसेच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष उभारी घेतो आहे. मी आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे आणि मला मनःपूर्वक आनंद वाटतो आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून पक्षहितासाठी कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया कांचन कावळे यांनी व्यक्त केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular