**उप विभागीय पोलिस अधिकाऱ्यांची धाड *अनेक प्रश्नांना फुटला पेव
अमित रंगारी
तुमसर :

अलगद पोलिसांच्या नाका खाली अवैधरीत्या देशी-विदेशी दारू विकणाऱ्या हॉटेल चालकावर चक्क पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत कारवाही करण्यात आली आहे. सदर कारवाही शुक्रवारच्या सायंकाळी करण्यात आली असून होटेलचे मालक योगेश घनश्याम निखाडे(३२, राह.राजेंद्र नगर तुमसर) याचे विरुद्ध तुमसर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथे आरोपी आपल्या श्यामतारा हॉटेल मध्ये अवैध रित्या दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिस उपविभागीय कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यातूनच पोलीस हवालदार जगदीश बुजाडे यांच्या लेखी तक्रारीवरून ती कारवाही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ह्या कारवाही नंतर अनेक प्रश्नांना पेव फुटले आहे. मात्र पोलीस स्टेशन तुमसरच्या अलगद बाहेर असलेल्या त्या हॉटेल मध्ये दारू विक्री पोलिसांच्या गुप्त यंत्रणेवर बोट दाखविणारी नक्कीच भासत आहे.
तुमसर शहरात अवैध दारू विक्री काही नवीन बाब नाही. मात्र अलगद पोलिसांच्या डोळ्यांसमोर देशी-विदेशी दारूची अवैध विक्री तुमसर शहरात अनके शंका उपस्थिती करणारी ठरली आहे. त्यात पोलीस सोडून उपविभागीय पोलिस कार्यालयातून श्यामतारा हॉटेल वर कारवाही होणे, आश्चर्य ठरले आहे. त्यात मिळालेल्या माहिती वरून गत अनेक वर्षापासून हॉटेल मालक हा अवैध दारू विक्री करत आहे. त्यात शुक्रवारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या कारवाहीत विदेशी दारूच्या १८० एम.एल. प्रत्येकी किंमत ५४० अश्या चार बाटल्या, देशी दारूच्या ९० एम.एल. प्रती नग ३० रुपयांच्या ९५ बाटल्या असे एकूण ३३९० रुपयांची दारू पोलीसांनी जप्त केली आहे. त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून हॉटेलचे मालक योगेश निखाडे याचे विरुद्ध महा. दारूबंदी कायद्याचे कलम ६५(ई), ७७ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दोन दुकानांच्या आगीनंतर श्यामतारा हॉटल प्रकरण- नेमके चालले तरी काय?
- कायद्यापुढे सर्वांना नतमस्तक व्हावे लागते मात्र ज्या ठिकाणी आग लागून दोन दुकाने ध्वस्त झाली होती, नेमका त्याच लगतच्या दुकानात अवैध दारू विक्रीचे प्रकरण उजेडात येणे? यातून त्या श्रीराम सिनेमागृहाच्या समोरील भू खंडावर नेमके चालले तरी काय? अशी प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर समोर येत आहेत. मात्र विना परवाना देशी वा विदेशी दारू विक्री करणे कायद्याने गुन्हाच आहे. येथे तुमसर पोलीसांनी संबंधित हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे. मात्र, विवादित त्या जागेवर सलग तीन दुकान आणि तीन घटना भविष्यात चित्र स्पष्ट करणारच, मात्र सध्या याच प्रकारे तुमसर शहरात इतरत्र चालणाऱ्या अवैध धंद्यांवरही पोलीसांनी आपली गुप्त यंत्रणा सज्ज करण्याची मागणी होत आहे.