*गराडा, खेडेपार व किटाडी ग्रामपंचायतीत नामनिर्देशन पत्र भरलेच नाही
लाखनी :

तालुक्यातील पोहरा ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ५ मध्ये गडपेंढरी व मेंढा या गावांचा समावेश होत असून या गावातील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी म्हणून निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र दीड वर्षापासून मागणी पूर्ण न झाल्याने व प्रशासनाने रिक्त जागी निवडणुकीची घोषणा करून निवडणूक घेतल्याने कॉंग्रेस समार्थित २ उमेदवार विजयी झाले असून गराडा, खेडेपार व किटाडी ग्रामपंचायतीत नामनिर्देशन पत्र भरलेच नसल्याने तेथील जागा अजूनही रिक्त आहेत. विजयी उमेदवारांमध्ये कॉंग्रेस समर्थित नागशेष रामकृष्ण शेंडे व दिगंबर सुखदेव उइके अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
पोहरा ग्रामपंचायतीत मेंढा व गडपेंढरी गावे समाविष्ट आहेत. ह्या गावांची लोकसंख्या ६०० चे वर असल्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी. या मागणी करिता गावकर्यांनी डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे या गावातील प्रभाग क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती सदस्यांची जागा रिक्त होती. याशिवाय गराडा, खेडेपार व किटाडी येथेही प्रत्येकी ०१ जागा रिक्त असल्यामुळे तालुका प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. ५ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत पोहरा प्रभाग क्र. ५ मधून अनुसूचीत जाती साठी नागशेष रामकृष्ण शेंडे यांना (४२५) तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित कवरलाल मेश्राम यांना (३५०) मते मिळाली असल्याने नागशेष शेंडे यांनी विजय संपादित केला आहे तर अनुसूचीत जमाती साठी राखीव असलेल्या दिगंबर सुखदेव उइके यांना (४१५ ) तर त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मण रायभान वरठे यांना (३८६) मते मिळाली मिळाली असल्याने दिगंबर सुखदेव उइके यांनी विजय संपादित केला आहे. विजयी उमेदवारांची यशवंत खेडीकर, विष्णु गिर्हेपुंजे, नारायण निर्वाण, फारूख छव्वारे , किशोर दोनोडे , सुमेध गेडाम, प्रल्हाद गायधणे यांचे नेतृत्वात गावातून विजयी रॅली काढण्यात आली. तर गराडा, खेडेपार व किटाडी ग्रामपंचायतीत उमेदवार न मिळाल्यामुळे अजूनही जागा रिक्त आहेत.