Saturday, June 25, 2022
Homeभंडारापारडी चीचखेडा गावाच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा

पारडी चीचखेडा गावाच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा

*पावसाच्या पाण्यामुळे रस्ता होतो दिसेनासा ; अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाचा दुर्लक्ष
मोहाडी :
मोहाडी वरून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी चीचखेडा गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था मोठ्या प्रमाणात खराब झालेली दिसून येत आहे. ग्रामवासीयांना बाहेर ये-जा करन्याकरिता त्यांना हा एकमेव रास्ता आहे. आणि या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. गावातील शेतकरी वर्गाला आणि कामगार वर्गाला आपला जीव हातात घेऊन या रस्तेने चालावं लागते.


मोटारसायकल आणि चारचाकी वाहत तर या रस्त्याने जाऊच शकत नाही. अश्या वेळी या गावात इमर्जन्सी सेवांचा तुटवडा पडण्याचे दिसून येते. एबुलन्स सारख्या सेवा गावात येत नसल्यावर जीव धोक्यात असल्या सारखेच आहे. पाण्याच्या मोसम चालू आहे अश्या वेळी रस्त्यात पडलेल्या खड्यांचा अंदाज घेत घेत लोकांना समोर जावं लागते यापेक्ष दुर्दैव्य काय? असा प्रश्न गावातील लोकांनी केलेला आहे
शासन प्रशासनांनी या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अनेक वर्षे लोटून गेली, वर्षा मागून वर्ष जात गेलेली आहेत ,अनेक निवेदने संबंधित विभागाला दिल्या गेली मात्र आजपर्यंत पारडी चीचखेडा रस्त्याला अद्यापही साधं दुरुस्तही सोडा,चुर्री सुद्धा साचलेल्या खड्यात घालता आली नाही, डांबरीकरण रस्ता करता आलं नाही. सदर रस्त्याला अनेक वर्षापासून मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, पावसाळा आला की खड्यात पाणी साचते, त्यामुळे कधी रस्ताही दिसेनासा होतो . परडी चीचखेडा असा प्रवास मोहाडी कडे करता येतो. परंतु अनेक वर्षे होऊन गेली पण सदर रस्त्याला डांबरीकरणं करू शकले नाहीत ही खूप मोठी शोकांतीका आहे. संबंधित बांधकाम विभाग यांनी आता तरी जागृत राहून, जनतेचा अंत न पाहता, झोपेचे सोंग घेणे बंद करून सदर रस्त्याला चुरी घालावी,जाणे-येणे तरी सोयीचं होईल. लवकरात लवकर शासन आणि प्रशासनाणे याकडे लक्ष द्यावे अन्यथा सर्व ग्रामस्थाना सोबत घेऊन जय किसान संघणेचे मोहाडी तालुका अध्यक्ष सुगत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा जय जवान जय किसान संघणेचे मोहाडी तालुका महासचिव रोशन हरकंडे यांनी केला आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular