Saturday, June 25, 2022
Homeभंडारापरवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

राज्य उत्पादन शुल्क व आबकरी विभाग निद्रिस्त * ६० रुपयाचा १८० मिली चा पव्वा ७० रुपयाला
लाखनी :
उत्पादनावर असलेल्या छापील किमतीपेक्षा अधिक रक्कम आकारून विक्री करू नये. असा कायदा आहे. एखादा विक्रेता असा प्रकार करीत असल्यास ती कृती ग्राहक हित विरोधी असून यात त्या विक्रेत्यास दंड व शिक्षेची कायद्यात तरतुद असली तरी त्यास बगल देऊन परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून १८० मिली च्या पव्व्याची किंमत ६० रुपये असताना ७० रुपयांस विक्री केली जाते याबाबद राज्य उत्पादन शुल्क व आबकारी विभागास माहिती असताना झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे यात अर्थकारण दडले असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत.


कोरोना काळात राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी तथा अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे दृष्टीने बंद परवाना धारक देशी दारू दुकाने व बिअर बार उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तर काही जिल्ह्यातील दारू बंदीही उठविली आहे. लाखनी तालुक्यात लाखनी , पोहरा , पालांदुर/चौरास व पिंपळगाव/सडक येथे ८ ते ९ परवाना धारक देशी दारू दुकाने आहेत. यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क व आबकारी विभागाचे आहे. देशी दारू दुकाने उघडण्याच्या समय सीमा शासनाने निश्चित केल्या असल्या तरी वेळेपूर्वीच दुकाने उघडली जातात व उशिरा बंद केली जात असल्यामुळे नियमाचे पालन केले जात नाही. तथा वीकएण्ड(शनिवार रविवार) ला दारू विक्री बंद ठेवण्याचे निर्देश असले तरी मागील दाराने चोरटी दारू विक्री केली जात असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत. याबाबद राज्य उत्पादन शुल्क व आबकारी विभागास माहिती असताना कानाडोळा करून धनऊगाई केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
परवाना धारक देशी दारू दुकानातून ७५० मिली , १८० मिली व टिल्लू(७०मिली) अशा ३ प्रकारात देशी दारू विक्री केली जाते. पैकी १८० मिली ची छापील किंमत ६० रुपये असताना ७० रुपयात विक्री केली जाते. तसाच प्रकार टिल्लू चे बाबतीतही आहे. परवानाधारक देशी दारू दुकाने व बिअर बार वर सनियंत्रणाचे काम राज्य उत्पादन शुल्क व आबकारी विभागाचे असले तरी वरदहस्त व संगनमताने असला नियमबाह्य प्रकार सुरू असून परवानाधारक आपले कोणी काही बिघडवू शकत नाही. या तोऱ्यात वावरतात. लाखनी तालुक्याची जबाबदारी दिवसे आणि बावनकुळे या कर्मचाऱ्यांकडे आहे. महिन्याचे ठराविक दिवशी हे हप्ता वसुलीसाठी देशी दुकानात दिसतात. इतर दिवशी यांचे दर्शन दुर्मिळ होते. अशा चर्चा होत आहेत. या प्रकाराने ग्राहकांची आर्थिक लूट होत असून ग्राहक संरक्षण कायद्याचेही उल्लंघन होत असले तरी राज्य उत्पादन शुल्क आणि आबकारी विभागाकडून या नियमबाह्य प्रकारावर लगाम लावण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्यामुळे या विभागाचे भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. याबाबद प्रतिक्रिया घेण्याकरिता आबकारी विभागाचे गजरे यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता संपर्क क्षेत्राबाहेर असल्यामुळे संपर्क झाला नाही. अधिक किमतीने दारू विक्री करणाऱ्या परवाना धारकांचा बंदोबस्त होते गरजेचे झाले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular