भंडारा :
देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी साहेब व विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे भंडाराचे युवा नेता तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुर्यकांत इलमे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला.

सुर्यकांत इलमे हे माजी न.प.उपाध्यक्ष भंडारा तर न.प. गटनेते सुद्धा होते. तर भाजपाचे सक्रिय जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी होते. त्यांचा कार्यकाळ त्याही वेळी पक्ष वाढीसाठी बळकट ठरला. संघटन वाढ करणे सुर्यकांत इलमे यांना जमते. भाऊंकडे तारुण्याची फळी मोठया प्रमाणात आहे. त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होईल. यावेळी संघटन मंत्री मा.डॉ. उपेंद्र कोठेकर, महाराष्ट्राचे सरचिटणीस मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री तथा आ.डॉ.परिणय फुके, खा. श्री.सुनिल मेंढे, भंडारा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. शिवराम गिर्हेपुंजे, जिल्हा महामंत्री, प्रशांत खोब्रागडे, जिल्हा महामंत्री श्री.पद्माकर बावनकुळे, तालुका अध्यक्ष श्री. विनोद बांते, नगरसेवक श्री. आशु गोंडाने, श्री.उमेश मोहतुरे, श्री.गोपाल डोकरीमारे, शिवेश कढव उपस्थित होते. उपस्थित नेते मंडळी यांनी सुर्यकांत इलमे यांचे अभिनंदन केले. सुर्यकांत इलमे यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सुद्धा आभार मानले.
……………………………….
• सुर्यकांत इलमे यांच्या प्रवेशा मुळे भाजपचा काय फायदा होईल ?
इलमे यांच्या प्रवेशा मुळे बीजेपी भविष्यात काय फायदा होईल असा प्रश्न भाजपा अनेक कार्यकर्ते व नेत्यांना विचारला असता त्यांनी या मुळे काहीच फायदा होणार नाही तर काहींनी नो-कामेंट असे उत्तर दिले तर काहींनी अश्या आयाराम गयाराम मुळे निष्टावंत कार्यकर्ते यांचेवर अन्याय होतो असे म्हणाले
………………………….
• सुर्यकांत इलमे यांनी नाना पटोले साथ सोडल्या मुळे काय नुकसान होईल ?
नाना पटोले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना राज्यातील कांग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी त्यांचे वर आहे त्या दृष्टीने त्यांचे काम सुद्धा सुरु आहे. इलमे कांग्रेस पार्टी मध्ये नव्हते, साधे सदस्य सुद्धा नव्हते , पटोले यांचेशि वयक्तिक संबंध होते. त्याचे पक्षाशी काही देणे घेणे नाही त्यामुळे इलमे भाजपात गेल्याने नाना पटोले किवा कांग्रेस पक्ष याचा काही नुकसान होणार नाही