Saturday, May 28, 2022
Homeभंडारानागपूर जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार - खासदार श्री...

नागपूर जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार – खासदार श्री प्रफुल पटेल

भंडारा :
खासदार श्री प्रफुल पटेल आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतानां उमरेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा श्री प्रफुल पटेलजी यांच्या उपस्थिती आशीर्वाद मंगल कार्यालय उमरेड येथे आयोजित करण्यात आला. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखल्या जाईल. नागपूर जिल्ह्यात व उमरेड विधानसभेवर माझे विशेष लक्ष असेल अशी ग्वाही श्री प्रफुल पटेल यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली.

कार्यक्रमाला माजी मंत्री श्री. रमेशचंद्र बंग, माजी मंत्री श्रावणजी पराते, शब्बीरजी विद्रोही, राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी आमदार राजेंद्रजी जैन, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार विजयजी घोडमारे, माजी आमदार दीनानाथजी पडोळे, प्रवीणजी कुंठे, सुनीलभाउ फुडे, प्रशांत पवार, बाबा गुजर जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष राजुभाऊ राऊत,राजू आकरे, अर्चनाताई हरडे, जावेद हबीब, ईश्वर बाळबुधे,दिलीप पनकुले,उमरेड येथिल सामजिक कार्यकर्ते जावेद पठाण, जीवनलाल डोंगरे, संजय वाघमारे, रितेश समर्थ, सुरेश कुकडे, सदानंद जैस्वाल, सुरेश कुकडे, नारायणजी लांबट, जि.प. सदस्या मनीषा फेंडर, विलास कांबळे,गंगाधर हूंगे,मुन्ना पटेल, पवन राऊत, संतोष महाजन, कैलाश वरेकर, शेखर शेटे, कल्पना हवेलिकर, अनिरुद्ध चचाने, बंटी तायडे, नारु हरदे, संतोष साहू सहित आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular