तुमसर :
तुमसर, येथील जनता विद्यालयात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचा Rangoli competition अनोखा उपक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात आला. प्रसंगी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींचा नीं पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

नवीन वर्षाच्या स्वागता साठी अनेक प्रकारचे आयोजन करण्यात येते. मात्र जनता शाळेत चक्क रांगोळी स्पर्धा घेत वेगळा पायंडा पाडला . इयत्ता 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण 15 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मनिष धावडे, प्रज्वल मेश्राम, यश ठोंबठों रे, हिमानी पेशने, दिशा भांडारकर, खुशी भोतमांगे, किरण भाडवे, समीक्षा गुरवे, नंदिनी शेंडे, आयुषी बरई, श्वेता आगाशे, सुमित जमदाल व पल्लवी लांजेवार यां विद्यार्थींनीचा समावेश होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुमित जमदाल, द्वितीय क्रमांक मनिष धावडे आणि तृतीय क्रमांक किरण भाडवे या विद्यार्थ्यांने पटकाविला. मुख्याध्यापक राजकुमार गभने, उपमुख्याध्यापक राजकुमार राठी, पंकज बोरकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी संगीता खोब्रागडे, माया बोरकर, उर्मिला कटरे, लीना मते, नंदा बावनकर, राखी बिसेन, भारती बोेंद्रेबोेंद्रे, विद्या बोरकर, दीपक हर्णे, अनिल पंचभाई उपस्थित होते.