Saturday, June 25, 2022
Homeभंडारानकली रेमडीसिव्हर इंजेक्शन विकणाऱ्या दोन नर्स सह तीन आरोपींना अटक

नकली रेमडीसिव्हर इंजेक्शन विकणाऱ्या दोन नर्स सह तीन आरोपींना अटक

(प्रमोद भांडारकर)
भंडारा :

करोना विषाणू देशात मृत्यू चे तांडव मांडले असून रेमडीसिव्हर , ऑक्सिजन व इतर औषधी , डॉक्टररांची लुट मोठ्या प्रमाणात होत आहे. रेमडीसिव्हर , ऑक्सिजन चा काळाबाजार सुरु होता. यामध्ये दावाखाण्यात काम करणारा स्टाफ , डॉक्टर व नर्सेस सुद्धा सामील आहेत. भंडारा जिल्हयात सद्धा काळांबाजार करणारे कुरकर्मा जनतेच्या जीवाशी खेळत आहेत , मात्र जिल्ह्यातील पोलीस यंत्रांना मात्र रेती तस्कारानां मदत करण्यात व जुगार अड्डे सुरु करण्यात , सर्व कागद पत्रे असताना नाहक गाडी वाल्यांना अडवून पैसा वसुलण्यात व्यस्त होती.
स्थानिक गुन्हा शाखा व औषधी प्रशासन विभाग यांनी संयुक्त सापळा रचून नकली रेमडीसिव्हर इंजेक्शन विकणारी टोळीला रंगेहात पकडण्यासाठी फोन वर सौदा पक्का करून ४ नकली रेमडीसिव्हर इंजेक्शन करिता १,२०,००० रुपये देऊन इंजेक्शन घेण्यास नियोजित स्थळी बोलवले व आधीच दबा धरून असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफी ने अटक केली अटक झालेले आरोपी सर्व भंडारा येथील रहीवासी आहेत त्यांनी अनेक लोकांना २० ते 30 हजार रुपयात नकली रेमडीसिव्हर विकून प्राण घेलेले आहेत अटक झालेले आरोपी १) बबन मन्साराम मेश्राम , वय ३५ वर्ष रा. म्हाडा कालोनी भंडारा ,सचिन अशोक हुमणे वय २९ वर्ष रा. म्हाडा कालोनी भंडारा ३) अनिकेत रंभाड ढवळे वय २१ रा. भंडारा असे आरोपी असून त्यांच्या दोन तस्कर नर्स माहिला व त्यांच्या संबंधी दवाखाना किवा सबंधित डॉक्टर यांचे नाव पोलसांनी जाणीव पूर्वक उघड केले नाही . या बाबत उलट सुलट माहिती प्राप्त होत आहे
आरोपी नर्स यांच्या घरांची झडती घेतली असता बराच औषधी साठा हस्तागात करण्यात आला अनिकेत रंभाड ढवळे वय २१ रा. भंडारा हा महाठग असून डॉक्टर असल्याचे सांगतो यात त्याचे कुटुंबीय या कालाबाजारीत गुंतले असल्याची चर्चा आहे.

नर्स महिला कडून मुद्दे माल जप्त व गुन्हा दाखल

आरोपी नर्स महिला व भामटा अनिकेत रंभाड ढवळे यांचे कडून नगदी ९०,००० व एक मोटार सायकल , तीन एनड्राइड मोबाईल असा एकूण १,७०,९६२ व औषधी साठा जप्त केला. अनिकेत रंभाड ढवळे हा मास्टर माइंड असल्याचे कळते यांच्या विरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १४५/२०२१ भांदवी कलम १८८, ४२० ,३४ , परिशिस्ट औषध किमत नियंत्रण आदेश २०१३ सहकलम ३(२) (क) , जीवन आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ७ सहकलम १८ (क), २७ (ख), सौदर्य प्रसाधन कायदा १९९९ चे कलम २ नुसार पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासात काळाबाजार करणारे डॉक्टर , हॉस्पिटल, दवाखाने अडकण्याची शक्यता पोलीस विभाग कडून वर्तविण्यात आली आहे. अन्न व औषधी प्रसाशन विभाग अधिकारी सह आयुक्त प्रशांत रामटेके यांनी जिल्ह्यातील रेमडीसिव्हर इंजेक्शन स्टाक व उपचारात येत असलेले इंजेक्शन यात फारच तफावत असल्याचे दिसून आले होते, परंतू नकली रेमडीसिव्हर इंजेक्शन पुरवठा करणारे यांचा विरुद्ध पुरावा मिळत नव्हता, ज्यांनी कुणी काळाबजारी करणाऱ्या भामट्या ठगा कडून इंजेक्शन घेतल्या असतील किंवा या इंजेक्शन घेतल्या नंतर पेशंट चा मृतु झाला असल्यास या भामट्या विरुद्ध पोलिसात तक्रार करावी असे आव्हान समाज सेवी संस्था कडून करण्यात येत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular