भंडारा :
वलसाड पोलिसांना भंडारा जिल्ह्यातील दो न बेपत्ता बालके Missing children सापडले असून सध्या या बालकांना भंडारा येथील बालसंरक्षण कक्षात ठेवण्या त आले आहे. तीन व पाच वर्षाच्या या बालकांची पटविण्याकरिता भंडारा जिल्हा बालसंरक्षण कक्षात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गुजरात राज्यातील वलसाड शहरात नकळतपणे आलेली दोन बालके स्थानिक पोलिसांना सापडली होती. 3 व 5 वर्षांचे ही बालके त्यां ची नावे दिव्यानी महेश पाटील व वैशाली महेश पाटील असे सांगत असून ते भंडारा, पवनी, नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती बाल पोलिस पथक वलसाडद्वारे भंडारा पोलिसांना देण्यात आली होती. या बालकांच्या सांगण्यावरून त्यांचे वडील महेश पाटील हे सेंट्री गचे काम तर आई काजल पाटील ही मेसच्या व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. पालकांनी त्यांच्या मामाचे नाव पंकज राहूल व आजोबांचे नाव नारायण ठोंबठों रे असल्याचे सांगितले. दोन्ही बालके जिल्हा बालसंरक्षण कक्ष, शिवाजी महाराज क्रीडा संकूल भंडारा येथे पाठविण्यात आले आहेत. या बालकांची कुणालाही ओळख असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी केले आह