साकोली :
येथील गणेश वॉर्डात राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांच्या तर्फे कोरोनाकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी आरोग्य सेवाकर्ते, अशा कार्यकर्त्यां व कर्तव्यावर असणार्या महिला पोलिसांचा साडी देत सत्कार करण्यात आला.

यात महिला पोलीस पीआय पी.पी. कुंभारे, महिला कॉन्स्टेबल सी. भुरे, आशा कार्यकर्त्या करूणा हांडे, सुनंदा टेंभुर्णे, शशिकला सुखदेवे, जास्वंता बोरकर, हेमलता उजगांवकर, नीता गहाणे, मंगला बारस्कर, प्रतिमा राऊत, साधना बडोले, अशा नंदेश्वर,सत्वशीला बडोले, शालू कांबळे, किरण रामटेके, कुंदा कोटांगले,जयशीला तरजुले, मनीषा नगरकर यांचा सत्कार दिशा फाऊंडेशन साकोलीच्या संचालिका सरिता फुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर साकोली तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष जया भुरे, ओयाजक शहर अध्यक्ष लता दुगकर, ज्योती कान्हेकर, सुरेखा शहारे, शीला वासनिक, सुरेखा साखरे, कांता रहांगडाले हजर होत्या. संचालन लता दुगरकर यांनी केले.