Tuesday, June 28, 2022
Homeभंडारादारुच्या अवैध भट्ट्यांवर आंधळगाव पोलीसांचे धाडसत्र सुरुच!

दारुच्या अवैध भट्ट्यांवर आंधळगाव पोलीसांचे धाडसत्र सुरुच!

*कांद्री भागातील फुटळा येथे कारवाई ; ३४ हजारांचा मुद्देमाल केला नष्ट
मोहाडी :
आंबागड जंगल परिसरात २८ जुलैच्या दिवशी अवैध दारुच्या हातभट्टीवर पडलेल्या धाडीनंतर आता आंधळगाव पोलीसांना कांद्री भागाच्या फुटाळा येथील अवैध धंदा रडारीत अडकला आहे. त्यातूनच मोहडी तालुक्यातील आंधळगाव पोलीसांचे सध्या परिसरात अवैध धंद्यांवर धाडसत्रच सुरु झाल्याचे यातून दिसत आहे. गुरुवारच्या दिवशी पडल्या ह्या सलग दुस-या दिवशीच्या धाडीत पोलीसांनी तब्बल ३४ हजार ९५० रुपयांचे अवैध दारुनिर्मितीत लागणारे मुद्देमाल नष्ट केले आहे. सदर धाड कांद्री परिसरातील फुटाळा शेतशिवाराच्या एका खोलगट भागात रंगारुपास आली असुन शिवराम इनवते हा इसम घटनास्थळावर पोलीसांनी आढळून आला आहे. ह्या धाडसत्रावरून आंधळगाव पोलीसांची गुप्त यंत्रणा सज्ज झाल्याचे भासत आहे.


आंधळगाव पोलीसांना बुधवारच्या दिवशी आंबागड तर आता गुरुवारला कांद्री भागात हातभट्टीवर अवैध दारु गाळणा-या टोळींबाबत गुप्त माहिती मिळाली आहे. सदर माहितीचा आधार घेत पोलीसांनी कांद्री भागातील फुटाळा परिसरात २९ जूलैला धाड मारून दारुच्या हातभट्टी लागलेल्या शेतशिवारातून रबरी ट्युबमध्ये ४० किलो मोहफुलाची दारु अंदाज़े रक्कम रुपये ४ हजार, १९ प्लास्टीक पिशव्यांमध्ये २५ किलो प्रती बॅग प्रमाणे ४७५ वजनाचे मोहफुलाचा सडवा अंदाज़े किंमत २८ हजार ५०० व इतर माती-धातूच्या साहित्यांसह एकुण ३४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

पोलीसांची सदर धडक कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने राबविन्यात येत असलेल्या क्रॅकडाऊन मोहीमेचा भाग असल्याचे कळलें आहे. त्यात कांद्रीच्या फुटाळा भागात पार पडलेल्या ह्या धाडीत पोलीसांनी म.दा.का. कायद्याच्या कलम ६५ (फ)ब,क,ड,ई, अन्वये कारवाई केली आहे. त्यात धाड़ मोहिम थानेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. गणेश पडवार, पो.शि. बडदे, वैरागडे व चमुने कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मार्गदर्शनात क्रॅकडाऊन मोहिमेमुळे परिसरात अवैध दारू गाळणा-या, त्याची विक्री करणारे तथा पुरवठा करणा-यांमध्ये पोलीसांप्रती भिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ह्या धाडसत्रामुळे अनेक हातभट्टी राबविणा-या टोळींनी काम बंद केले आहे. तर आंबागड, फुटाळा नंतर आता आंधळगाव पोलीसांच्या रडारवर नेमके कोणते ठिकाण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular