Saturday, May 28, 2022
Homeभंडारादलितवस्ती सुधार योजनेतून झालेल्या कामांची चौकशी करा

दलितवस्ती सुधार योजनेतून झालेल्या कामांची चौकशी करा

*उर्जा मंत्र्यांकडे निवेदनातून मागणी , चौकशी झाल्यास अधिका-यांवर गाच?
तुमसर :
नुकताच तुमसर तालुक्यातील माडगी येथे राज्य उर्जामंत्री नितीन राऊत यांचा दौरा पार पडला. महावितरण विभागाच्या उपकेंद्राच्या उद्घाटनापेक्षा इतर विषयांमुळेही सदर दौरा चर्चेत आला आहे. समारंभ पार पडल्यानंतर २८ आगस्टला भंडारा येथे राऊत यांचा काही काळ थांबा होता. येथेच तुमसर नगर परिषद अंतर्गत मागील ५ वर्षात पार पडलेल्या दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आले आहे. विशेष दर्जा प्राप्त ह्या निधीतून शहरात अनेक कामांमध्ये घोळ झाल्याची शंका व्यक्त करुन सामाजिक कार्यकर्ता जय डोंगरे यांनी चौकशीची मागणी मंंत्र्यांकडे व्यक्तीगत सादर कली आहे. चौकशीच्या मागणीत पाच सदस्यीय समीती नेमुन मुद्दा हाताळण्याची विनंती या दरम्यान करण्यात आली आहे. डोंगरे यांच्या निवेदनावर रिमार्क्स करुन जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठपुरावा करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले आहे. न प अंतर्गत झालेल्या ह्या कामांची चौकशी बसल्यास अनेक प्रशासकीय अधिकारीही गोत्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.


राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे अनुसुचित जाती विभाग, अखिल भारतीय काग्रेस कमेटीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचीही कमान आहे. त्यात २८ आॅगस्टला राऊत यांचा माडगी दौरा पार पडला. भंडाराच्या सर्कीट हाऊसमध्ये सायंकाळी पार पडलेल्या खास मिटींगमध्ये जय डोंगरे यांनी न प संदर्भात महत्वाचे निवेदन सादर केले आहे. निवेदनातून नप च्या दलितवस्ती सुधार कायद्यावर बोट ठेवून अधिकारी व आम सभेत उपस्थित त्या त्या प्रतिनिधींनी निधी हेतूपरस्पर वळविल्याची टिका डोंगरे यांनी निवेदनातून केली आहे. त्यात दलितवस्तीच्या नावाखाली रस्ते बांधकाम, रस्ते सुधारना, रस्ता सौंदर्यीकरण, सभा भवन व इतर कामांवर डोंगरे यांनी शंका व्यक्त केली आहे. गत ५ वर्षात पार पडलेली दलितवस्तीची कामे ही त्या कक्षेत मोडतात की नाही? दलितवस्तीचे मापदंड येथे मोडून नगर रचनाकारांनी हेतूपरस्पर विकास कामे मंजूर केली कशी? यावर अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्ष या नात्याने राऊत यांना विनंती करण्यात आली आहे.
शहरात मुख्य ठिकाणचे रस्ते दलितवस्तीला जोडणारे मार्ग दाखवून केलेली कामे, दलित वस्तीचे पॅकेट प्रमाणित असतांना शासन निर्णयावर बोट ठेवून अधिका-यांचे काम,नाली बांधकाम, पेव्हरचे काम यामध्ये कोट्यावधीचा निधी वळविण्यात आला आहे. येथे दलितवस्तीची घनता न पळताळता व शासन निर्णयाची अवहेलना तसेच वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित होवून चौकशीत अडकलेल्या लाखोंच्या कामांचा डोंगरे यांनी त्या निवेदनात पुरावा दिला आहे. येथे ते निवेदन राऊत यांच्याकरीता अनुसुचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने महत्वाचे ठरले आहे. त्यात त्यावर तत्काळ अभिप्राय देवून जिल्हाधिकारी भंडारा यांना चौकशी करण्यास सुचना दिल्या जाणार असल्याचे आश्वासन राऊत यांच्याकडून डोंगरे यांनी देण्यात आले आहे. येथे जर दलितवस्ती अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी स्वतंत्र समिती मार्फत होते तर अनेक भोंगळ कामे उजेडात येवून न प प्रशासकीय अधिका-यांवर गाच नक्की पडणार असा भरोसा डोंगरे यांनी व्यक्त केला आहे. दलितवस्ती सुधार योजनेतून झालेल्या कामांची चौकशी करा

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular